Edition

शहापूर पोलिसांची मोठी कारवाई! रेकॉर्डवरील आरोपी पिंटू रॉय दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६(१)(ब) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार शहापूर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी पिंटू उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
पिंटू रॉय याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात एकूण ३ दखलपात्र व ३ अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(ब) अन्वये हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली.
या प्रस्तावाची दखल घेत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांनी पिंटू उपेंद्र रॉय याला कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार आजपासून पिंटू उपेंद्र रॉय याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शहापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!