Edition

प्रशासनाचे उघडले डोळे! वृत्ताची दखल; शेंडगेवाडी बोगद्याखाली तात्पुरती डागडुजी..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती वृत्ताची दखल

सांगली प्रतिनिधी – शेंडगेवाडी-चांदोली मुख्य मार्गावरील शेंडगेवाडी बोगद्याखाली मोठमोठे खड्डे आणि साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, या मार्गावर अपघातांची शक्यताही वाढली होती.
या गंभीर समस्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची अखेर प्रशासनाने दखल घेतली. संबंधित विभागाकडून बोगद्याखालील खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी व डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ही केवळ तात्पुरती उपाययोजना असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी वारंवार पाणी साचत असल्याने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती, योग्य जलनिस्सारण व्यवस्था आणि दर्जेदार काम करण्याची मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात पुन्हा याच समस्येला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!