
वाशिम प्रतिनिधी : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथे रविवार, दि. 26 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला मात्र पाहिजेत तसा पाऊस आतापर्यंत झालेला नाही.
सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, हळद तसेच इतर पिकांच्या वाढीसाठी या पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे शेतातील ओलावा वाढून पिकांच्या वाढीस चालना मिळणार असून तणनियंत्रणानंतर पिकांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दमदार पावसामुळे परिसरातील वातावरणही आल्हाददायक झाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळातही समाधानकारक पाऊस सुरू राहावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.










