Edition

अभंग, भारूड आणि रिंगणाने उत्कर्ष विद्यालयातील वारकरी दिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या उद्देशाने उत्कर्ष विद्यालयात वारकरी दिंडीचे भव्य व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, रामरावजी रोडगे (भाऊ ) डॉ. सविता रोडगे, आदित्य रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे (पारवे), मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे, सौ. ज्योती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्कर्ष विद्यालयातून दिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर सेलू चौक, मठ गल्ली, सेलू बसस्थानक मार्गे पुन्हा विद्यालयात दिंडीचे आगमन झाले. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत वारकरी परंपरेचे दर्शन घडविले.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पारंपरिक रिंगण, आकर्षक समूह नृत्य, भावपूर्ण अभंग, प्रबोधनात्मक भारूड मनमोहक गवळणी तसेच विध्यार्थ्यानी ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपान देव, मुक्ताई संत एकनाथ, संत जनाबाई यांची वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सांस्कृतिक सादरीकरणातून संत परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान, शिस्त, भक्तीभाव आणि सामाजिक मूल्ये विकसित होतात, असे मत व्यक्त केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी उत्कर्ष विद्यालयातील नृत्य दिग्दर्शक श्री प्रफुल सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!