#
इस्लामपूर, प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तीपीठ
इस्लामपूर, प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध अधिक तीव्र होत असून, हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी १८ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे राज्यातील बाधित शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा आणि ‘सद्बुद्धी यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाखरी मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा होणार असून, त्यानंतर वाखरी ते श्री विठ्ठल मंदिर अशीथर हजारो शेतकऱ्यांची पायी सद्बुद्धी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी विठ्ठल चरणी एकत्र येणार आहेत. सुपीक शेती, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रकल्प मागे घेण्याची सद्बुद्धी पांडुरंगाने द्यावी, अशी सामूहिक प्रार्थना या यात्रेद्वारे करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणावर सुपीक शेती संपादित होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार असल्याने या प्रकल्पाला व्यापक विरोध होत आहे.
यापूर्वीही विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे, धरणे, ग्रामसभा तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमधून महामार्गाविरोधात ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारने प्रकल्प अधिकृतपणे रद्द न केल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ जुलै रोजी वाखरी येथे होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले.
या सद्बुद्धी यात्रेत आमदार जयंत पाटील, आमदार सतेज (बंटी) पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉ. गिरीश फोंडे, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, अनिल पाटील, रणजीत पाटील, किरण तात्या लाड, दीपक लाड यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
हा लढा केवळ जमिनीचा नसून शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचविण्याचा असल्याचे सांगत, शक्तीपीठ महामार्गग्रस्त १३ जिल्ह्यांतील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांनी १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाखरी (पंढरपूर) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाखरी मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा होणार असून, त्यानंतर वाखरी ते श्री विठ्ठल मंदिर अशीथर हजारो शेतकऱ्यांची पायी सद्बुद्धी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.