हे
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
मानवत : परभणी ते मानवत रोडवरील कोल्हा पाटी जवळ असलेल्या प्रसिद्ध यश वाडी मारुती मंदिरात शनिवार दि. 20 जून रोजी दुपारच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली असून मंदिराच्या गाभाऱ्याचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात चार किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 40 ते 50 भाविक जखमी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यश वाडी येथील मारुती मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू होते. या बांधकामासाठी जड दगडांचा वापर केला जात होता. शनिवार हा दर्शनाचा मुख्य दिवस असल्याने दुपारच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती भाविक गाभाऱ्यात दर्शन घेत असताना अचानक बांधकामाचा गाभारा विशेषत:जड दगड भाविकांच्या अंगावर कोसळले गाभारा कोसळल्याने मंदिरात एकच गोंधळ आणि पळापळ सुरू झाली. या दुर्घटनेत अनेक भाविक दगडांच्या ढिगार्या खाली गाडले गेले. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात पोहोचण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून अधिकृत तपशील आणि मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही. यावेळी आ. राजेश विटेकर, जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण, शिवसेना नेते सईद खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून बचाव कार्यास मदत करत आहेत. पोलीस प्रशासन या घटनेचा पुढील तपास करत आहे.










