Edition

मंगरूळपीर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव,
वाशिम : मंगरूळपीर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे तसेच पोलीस स्टेशन परिसरात स्थापित करण्यात आलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाबीमुळे कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारी घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इरफान शेख यांनी संबंधित विभागाकडे लेखी निवेदन सादर करून शहरातील सर्व बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्यात यावी व यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात शहरातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणांचे तांत्रिक परीक्षण (ऑडिट) नियमितपणे करण्यात यावे, देखभाल व नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात यावी तसेच आवश्यक ठिकाणी नवीन व उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!