Edition

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नाट्य; न्यायालयाने १० नोव्हेंबरला नव्याने सभा बोलावण्याचे आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी प्रविण केर्ले : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदावरून राजकीय आणि कायदेशीर रस्सीखेच चिघळली आहे. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. एकूण २५ संचालक असलेल्या मंडळात अध्यक्ष निवडीसाठी किमान १४ संचालकांचा कोरम आवश्यक असताना केवळ एका जागेच्या फरकामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिले. कोरम पूर्ण न झाल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. मात्र, समविचारी आघाडीच्या उपस्थित १३ संचालकांनी शशिकांत चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. या निर्णयाला महायुतीने आव्हान देत ती निवड बेकायदेशीर असल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतल्यानंतर सलग तीन तास कायदेशीर युक्तिवाद झाला.

समविचारी आघाडीतर्फे अॅड. आशुतोष कुंभकोणी, अॅड. श्रीकृष्ण गनबावले आणि अॅड. ऋतुराज पवार यांनी बाजू मांडली, तर महायुतीतर्फे अॅड. श्रीनिवास पटवर्धन, अॅड. अनिल साखरे आणि अॅड. प्रल्हाद परांजपे यांनी युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने १० नोव्हेंबर २०२६ रोजी पुन्हा नव्याने सभा बोलावून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सत्ता आपल्या हातातून जाऊ नये म्हणून महायुतीने शासकीय सदस्यांच्या नियुक्तीची रणनीती आखल्याची चर्चा आहे. संचालक मंडळात चार शासकीय सदस्यांची नियुक्ती करून त्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष वटहुकूम काढला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या नियुक्त्यांसाठी शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ आणि अशोक फराकटे यांची नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, चौथ्या सदस्याच्या नावावर मोहोर उमटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

आता सर्व २५ संचालक १० नोव्हेंबरच्या सभेला उपस्थित राहणार का आणि गोकुळचा नवा कारभारी कोण ठरणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

error: Content is protected !!