Edition

माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारात पाठवा ; ‘पेटा’ ची सर्वोच्च न्यायालयात याचिका.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर.

वनतारामधून परत कोल्हापुरातील नांदणी
मठात आलेल्या माधुरी हत्तीणीला परत वनतारामध्ये स्थलांतरित करण्यात यावे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत पेटाने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. वनतारामध्ये ती आपली मैत्रिण शांतीसोबत मुक्त विहाराचा आनंद घेत होती मात्र आता एका शेडमध्ये ती एकाकी असल्याचे या याचिकेत पेटाने म्हटले आहे.

माधुरी हत्तीण नांदणी मठात येऊन पंधरा दिवस झाले नाहीत तोपर्यंत पेटा इंडियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माधुरी हत्तीण कोल्हापुरात ११ ते १२ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात परतल्यानंतर तिला आतषबाजी कर्णकर्कश घोषणा, ढोलताशांचा आवाज याचा त्रास झाला. आता साखळदंडात जखडलेल्या एखाद्या कैदयाप्रमाणे ती जगत असल्याचा आरोप पेटाने या याचिकेव्दारे केला आहे.

माधुरीला पुन्हा मठात हलवणे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ जुलै २०२५ च्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २८ जुलै २०२५ च्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे नमूद करत पेटाने याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!