Edition

सेलु तहसील मधून वाळूचे ट्रॅक्टर पळविणा-यावर कारवाई होणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
सेलू तालुका प्रतिनिधी.

@चोरीच्या कारवाईची प्रक्रिया का अडकली ?
@वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचे हेड तहसील मध्ये कसे आले परत.

सेलू : सेलूसह संपूर्ण तालुक्यात वाळूच्या वाढत्या चोरीस महसूल आणि पोलीस यांचे मवाळ धोरणच कारणीभूत असल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना आणि कसुरा या नदीच्या पात्राची वाळू वाहतूकदारांनी अक्षरशा चाळणी केली आहे. अशीच एक घटना राष्ट्रीय महामार्गावर आणि तहसील परिसरात घडली आहे. या मार्गावरून मोरेगावहून सेलूच्या दिशेने वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर महसूलचे कर्मचारी यांना आढळून आले. खूपसा येथील तलाठी वैष्णवी बन आणि दीपक गांगुर्डे यांनी हे ट्रॅक्टर २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२:२९ वाजता राष्ट्रीय महामार्गावर सेलू रस्त्यावर पकडले. काही वेळाने दोन पोलीसही या कर्मचाऱ्यांच्या मदतीला आले. आणि उभयतांनी दुपारी १२:४३वाजता तहसील परिसरात वाळुने भरलेले ट्रॅक्टर लावले. रीतसर पंचनामा नंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर तहसीलच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र सायंकाळी सहाच्या नंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळविण्यात आले. आणि २९ सप्टेंबर रोजी पुन्हा ट्रॅक्टरचे हेड तहसील कार्यालय परिसरात दिसू लागले. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा ट्रॅक्टर लावण्यापासून पळविण्यापर्यंत आणि फक्त हेड आणण्याच्या वाळू वाहतूकदाराने केलेला खटाटोप तहसीलच्या फुटेज मध्ये असणार आहे. परंतु वाळू तस्करांचा कर्दनकाळ काळ म्हणून घेणारे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी असो की, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्यापैकी कोणीही तलाठ्यांनी केलेले या कारवाईबद्दल साधे कळविले देखील नाही. मग वाळूचे ट्रॅक्टर पळविणा-यावर काय कपाळ कारवाई करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. आता हे प्रकरण दाबण्यासाठी वाळू वाहतूकदार श्रेष्ठ ठरतात की, चोरीची कारवाई करून महसूल विभाग वरचढ ठरते. हे पाहण्यासारखे आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!