Edition

गडमुडशिंगीत फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा जागर: शाळा नामकरणासाठी रिपब्लिकन सेनेची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी-
उदय साळुंखे, शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव गडमुडशिंगीच्या जिल्हा परिषद शाळांना देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भीमराव आनंदा गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद प्रशासनाला जाहीर निवेदन देण्यात आले.
गडमुडशिंगी ता. करवीर येथील कुमार विद्यामंदिरचे ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले कुमार विद्यामंदिर, गडमुडशिंगी’ आणि कन्या विद्यामंदिरचे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यामंदिर, गडमुडशिंगी’ असे नामकरण करावे, तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या/बांधलेल्या इमारतीस ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संकुल’ असे संयुक्त नाव द्यावे, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “विद्येविना मती गेली” सांगून फुले दाम्पत्याने गोरगरिबांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आज आमची मुले ज्या शाळेत शिकत आहेत, ती शाळा त्यांच्याच त्यागातून उभी आहे. त्यामुळे शाळेला त्यांचे नाव देणे हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा व शिक्षण चळवळीचा खरा गौरव ठरेल.
हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि गटविकास अधिकारी करवीर यांच्या नावे देण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक चंद्रकला उद्धवराव घुगे यांनी हे निवेदन स्वीकारले.
प्रशासनाने या भावनावृद्धी आणि ऐतिहासिक मागणीचा तात्काळ विचार करून नामकरणाचा ठराव मंजूर करावा, अन्यथा रिपब्लिकन सेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी:
याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, जिल्हा महासचिव सागर कुरडे, करवीर महासचिव अर्जुन गोंधळी, कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रवीण आजवेकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद कांबळे, करवीर उपाध्यक्ष विवेकानंद रजपूत, करवीर महासचिव अर्जुन कांबळे, करवीर संघटक शिवाजी कांबळे, करवीर कोषाध्यक्ष संदीप गोंधळी आणि बहुजन पत्रकार अलंकार माने हे उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!