Edition

पालकमंत्री मा. चंद्रकांत दादांच्या सूचनेनुसार मनोज-मनालीच्या शिक्षणाचा मार्ग झाला सुकर!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आष्टा | प्रतिनिधी
दारात कचरा टाकल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कुपवाडच्या केसरकर कुटुंबातील मनोज आणि मनाली यांच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आणि ते निराधार झाले. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.
मनोज आणि मनाली यांच्या शिक्षणासाठी प्रवेशाचा प्रश्न काही काळापासून प्रलंबित होता. विविध प्रयत्न करूनही प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांच्या शिक्षणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
ही बाब पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा यांच्या निदर्शनास आल्यानंतर, पालकमंत्री म्हणून सर्वांचे पालकत्व स्वीकारत ते निभावणाऱ्या दादांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यांच्या सूचनेनुसार मा. चिमणभाऊ डांगे आणि मा.विश्वासबापू डांगे यांनी मनोज व मनाली यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलत, त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
तसेच मा. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल, आष्टा संस्थेनेही दोन्ही लेकरांच्या प्रवेशासाठी आवश्यक सहकार्य केले. त्यामुळे अखेर मनोज आणि मनाली यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून, त्यांच्या भविष्यातील शिक्षणाची नवी वाट खुली झाली आहे.
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या दोन बहीण – भावाच्या पाठीशी उभे राहत मा. चिमणभाऊ डांगे आणि मा. विश्वास बापू डांगे यांनी त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे, ही या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मोठी आधाराची बाब ठरली आहे.
अडचणीच्या काळात मिळालेली ही साथ आणि शिक्षणाची मिळालेली संधी मनोज-मनालीच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. डांगे परीवाराची ही संवेदनशीलता निश्चितच कौतुकास्पद आहे…..

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!