Edition

कर्तव्य आणि आरोग्याची उत्तम जोड; गडमुडशिंगीचे भुमिपुत्र आणि गांधीनगरचे ग्रामसेवक विजय पाटील यांनी पूर्ण केली ‘रण सह्याद्री चॅलेंज हिल मॅरेथॉन’!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर: प्रतिनिधी – उदय साळुंखे,

पंचगणीच्या सुंदर आणि आव्हानात्मक टेकड्यांवर नुकत्याच पार पडलेल्या ‘रण सह्याद्री चॅलेंज हिल मॅरेथॉन २०२६’ मध्ये, गांधीनगरचे ग्रामसेवक आणि गडमुडशिंगीचे सुपुत्र विजय शरद पाटील यांनी एक विशेष कामगिरी केली आहे. केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत दररोजचे काम करणेच नव्हे, तर स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
या मॅरेथॉनमधील २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करून, त्यांनी हे सिद्ध केले आहे की योग्य नियोजन आणि दृढनिश्चय असेल तर कर्तव्य आणि आवड यांचा समतोल कसा साधायचा.
गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या ग्रामसेवकाने मैदानावर दाखवलेले हे धाडस संपूर्ण गडमुडशिंगी गावांसाठी अभिमानास्पद आहे आणि गावकरी व इतर तरुणांसाठी नक्कीच एक मोठी प्रेरणा ठरेल.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!