Edition

रेल्वे रुळावर मोबाईलमध्ये व्यस्त १६ वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हातकणंगले वृत्तसेवा – हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहासमोर रेल्वे रुळावर बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनुष्का संतोष पोवार (वय १६ वर्षे २ महिने, रा. गल्ली नं. ३, वेताळ पेठ, इचलकरंजी) असे मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का ही आपल्या मैत्रिणींसोबत रेल्वे रुळावरून ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने जात होती. तिची एक मैत्रीण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल असल्याने तिला भेटण्यासाठी त्या रुळावरून जात असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी अनुष्काच्या कानात एअरबड्स होते आणि ती मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे समजते. दरम्यान, रेल्वे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या सोबतच्या मैत्रिणीने तिला हाक मारून सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कानात एअरबड्स असल्याने आणि मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे तिला मैत्रिणीचा आवाज ऐकू आला नाही.

मैत्रिणीने अनुष्काचा हात धरून तिला रेल्वे रुळावरून बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न सुरू असतानाच रेल्वेची धडक होऊन अनुष्काचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे अनुष्काच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!