Edition

रुक्मिणी ईलगे यांचे दुःखद निधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड : तालुक्यातील गवसे (इलगेवाडी) येथील आदरणीय कै.रुक्मिणी वैजू ईलगे यांचे दि.९ सप्टेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने ईलगे कुटुंबीयांसह नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

कै. रुक्मिणी ईलगे या प्रेमळ, मायाळू, कुटुंबवत्सल आणि संस्कारशील मातोश्री म्हणून परिचित होत्या. संतोष ईलगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांनी आपल्या कुटुंबाला प्रेम, माया आणि चांगले संस्कार देत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध ठेवत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या सुखासाठी समर्पित केले.

त्यांच्या साध्या, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे नातेवाईक व परिचितांच्या मनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या सहवासातील प्रेमळ आठवणी कुटुंबीयांच्या कायम स्मरणात राहतील.

कै.रुक्मिणी ईलगे यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना आणि पाच नातवंडे असा मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपल्या जिव्हाळ्याच्या आणि आधाराच्या व्यक्तीला गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नसल्याची भावना कुटुंबीय व नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.

कै.रुक्मिणी ईलगे यांच्या निधनाने ईलगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव कुटुंबीयांच्या हृदयात जिवंत राहतील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि ईलगे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!