Edition

कामेरीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; जमीन मोजणीला तीव्र विरोध..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

“कोणता अधिकारी आमच्या जमिनी मोजतो, ते बघतोच!” शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची एकमुखी मागणी..

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर कामेरी येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जमिनींची त्यांच्या संमतीशिवाय मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
“आमच्या जमिनी आमच्या हक्काच्या आहेत. या जमिनींवर आमच्या अनेक पिढ्यांचा संसार उभा आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी शांत बसणार नाहीत,” असा आक्रमक पवित्रा बैठकीत घेण्यात आला.
जमीन, पाणी आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी आता हा लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. या संघर्षात शेतकऱ्यांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!