
१४ नोव्हेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम. मिळाल्याचे स्पष्ट केले. दोन्ही गटांकडून आपल्याला कोणताही अधिकृत प्रस्ताव किंवा संदेश मिळालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटानेही विलीनीकरणाच्या वृत्तांचे खंडन केले.
आता पुढे काय?
सध्या उपलब्ध विधानांवरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. अजित पवार हयात असताना दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली होती; मात्र त्यांच्या निधनानंतर त्या प्रक्रियेचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. त्यामुळे भुजबळ आणि तटकरे यांच्या विधानांना सध्याच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा समजणे योग्य ठरणार नाही.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील चर्चेचा इतिहास, सध्याचे नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय समीकरणे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रतिनिधी – प्रविण केर्ले









