Edition

OTP शेअर केला नाही तरीही बँक खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात; सायबर फसवणुकीचे नवे मार्ग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई/प्रतिनिधी: बँकिंग फसवणुकीमध्ये बहुतेकांना असे वाटते की OTP शेअर केला नाही तर पैसे सुरक्षित असतात. मात्र सायबर गुन्हेगार आता OTP शिवायही बँक खात्यातील पैसे चोरण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत असल्याचे सायबर सुरक्षा जागरूकतेअंतर्गत नमूद करण्यात आले आहे.

फसवणुकीचे प्रमुख मार्ग म्हणजे बनावट लिंकद्वारे माहिती चोरणे, बँक अधिकारी असल्याचे भासवणारे कॉल, बनावट ॲप्सद्वारे डेटा चोरणे, चुकीच्या QR कोडद्वारे फसवणूक, तुमचा मोबाईल दूरून नियंत्रित करणे आणि असुरक्षित Wi-Fi नेटवर्कवरून डेटा धोक्यात आणणे.

नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी ॲप्स इन्स्टॉल करू नये, UPI PIN आणि बँक माहिती शेअर करू नये तसेच अनोळखी व्यक्तीला स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट ॲक्सेस देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. ही माहिती मित्र-परिवारासोबत शेअर करून अधिकाधिक नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दत्तकुमार पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा..! “कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर; ‘दत्तकुमार पाटील यांनीच निवडणूक लढवावी’ अशी मागणी, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दत्तकुमार पाटील यांचे स्पष्ट मत”..!

traffic tail

error: Content is protected !!