प्रतिनिधी : प्रविण केर्ले
किणी टोल नाका येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार श्री. राजू शेट्टी साहेब यांच्यावतीने सुरू असलेल्या “चक्काजाम” आंदोलनास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी किणी टोल नाका परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
आंदोलनात उसाला पहिली उचल प्रतिटन ४५००/- रुपये मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, बालसिंग रजपूत, जयसिंगपूर शहरप्रमुख राजू सुतार, पांडुसिंग रजपूत, उदयसिंह शिंदे, युवानेते अरविंद मस्के, जोहेब हलगले, बाळासाहेब शिंदे, तळसंदे शहरप्रमुख भानुदास पाटील, विनायक भोसले, संतोष भोसले, ऋषिकेश दबडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.










