Edition

गोकुळमध्ये मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; आमदार सतेज पाटील यांचा महायुतीवर सडकून प्रहार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रविण केर्ले :
: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून न्यायालयीन लढा सुरू असतानाच, गोकुळमध्ये बहुमत मिळवलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील माध्यमांना थेट पत्र लिहून महायुतीकडून मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. या प्रश्नावर त्यांनी सडकून प्रहार केला आहे.

प्रशासकीय काळात तोटा वाढत असताना, दुष्काळ आणि चाऱ्याच्या प्रश्नासमोर निर्णय घेणारे लोकनियुक्त मंडळ गोकुळमध्ये अस्तित्वात नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. आम्ही विरोधी संचालकांनाही नम्र आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांचा कौल स्वीकारा आणि पुढील सभेला उपस्थित राहा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.

आम्ही कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने लढणार आहोतच; तथापि आज गोकुळमध्ये जे घडत आहे, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकते. महाराष्ट्रातील सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचा आवाज बनून जनतेसमोर वास्तव मांडा, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे.

“मग निवडणुका घ्यायच्या कशाला?”

जनतेचा कौल तांत्रिक कारणांनी रोखला जात असेल, तर मतदानाला अर्थ काय उरतो? केवळ गोकुळमधील बहुमतासाठी कायदा बदलण्याची किंवा शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याची चर्चा होत असेल, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? अशी विचारणाही सतेज पाटील यांनी पत्रात केली आहे.

पत्रात काय म्हटले आहे?

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांनी नेहमीच सत्याची बाजू मांडली आहे, म्हणूनच विश्वासाने हे पत्र लिहीत असल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची निःस्वार्थ सेवा, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नेटके नियोजन आणि वैकुंठभाई मेहता यांची नैतिक शिस्त यातून महाराष्ट्रात सहकार उभा राहिला. शेतकरी हाच संस्थेचा खरा मालक असावा, हेच या सर्वांचे स्वप्न होते. आज गोकुळच्या माध्यमातून सहकाराच्या या गाभ्यावरच घाला घातला जात आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

error: Content is protected !!