Edition

कणेगाव-भरतवाडीत म्हशीच्या पोटी दोन तोंडे, तीन डोळे असलेल्या रेडकाचा जन्म आगळ्यावेगळ्या रेडकाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाळवा तालुक्यातील कणेगाव-भरतवाडी येथे म्हशीच्या पोटी दोन तोंडे, तीन डोळे असलेल्या आगळ्यावेगळ्या रेडकाचा जन्म झाला आहे. या रेडकाला दोन तोंडे, चार नाकपुड्या, तीन डोळे, दोन जिभा आणि दोन हनुवट्या असल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. या रेडकाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
कणेगाव-भरतवाडी येथील शेतकरी कृष्णात यशवंत निकम यांच्या म्हशीने या रेडकाला जन्म दिला. रेडकाची शारीरिक रचना इतर रेडकांपेक्षा वेगळी असून, त्याचे इतर शरीराचे भाग व्यवस्थित असल्याचे दिसून येत आहे.
या आगळ्यावेगळ्या रेडकाच्या जन्माची बातमी परिसरात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी निकम यांच्या घरी गर्दी केली. रेडकाची अनोखी शारीरिक रचना पाहून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

error: Content is protected !!