

पुणे प्रतिनिधी – शिवसेनेच्या शिक्षक शिक्षकेतर संघ आणि शिव कामगार सेना यांच्या वतीने तळजाई पर्वती, धायरी, कोल्हेवाडी, कीरकीटवाडी परिसरातील गरीब,विधवा व अनाथ 21 कुटुंबीयांना दिवाळी निमित्त फराळासाठी शिधा वाटप करण्यात आले. तसेच साडी आणि विशेष गिफ्टचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शिक्षक शिक्षिकेतर संघाचे पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी सर यांनी केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, अण्णा बनसोडे, सुबोध वाघमारे, जानपठारे, रितिक आरणे आदी उपस्थित होते.
गरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिरा वाटप करणे हा एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आहे. वाढत्या महागाईमुळे आणि वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेक गरीब कुटुंबांना दिवाळीचा आनंद घेणे कठीण होते. अशावेळी त्यांना मदत केल्याने त्यांच्याही घरात आनंदाचा दिवा लागू शकतो असे मत शिवसेना शिक्षक शिक्षकेतर संघाचे पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी सर यांनी व्यक्त केला.










