Edition

करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ चालू करा; शिवसेनेचा हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी-उदय साळुंखे

करवीर तालुक्यातील सुमारे ५००० रेशन कार्ड धारकांचे शासन स्तरावर चुकीचे निकष लावून बंद करण्यात आलेले रेशन तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी करवीर शिवसेनेच्या वतीने हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या निवेदनानुसार, करवीर तालुक्यातील जवळपास ५००० रेशन कार्डधारकांचे रेशन शासनाने कोणत्याही अटी व नियमांचे कारण पुढे करून बंद केले आहे. लाभार्थी कंपनीचा संचालक नसावा, आय.टी. रिटर्न भरलेला नसावा यांसारखे चुकीचे निकष लावून गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे. यासंदर्भात यापूर्वीच तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते, तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणताही निर्णय न घेतल्यामुळे अखेर शिवसेनेला आक्रमक भूमिका घ्यावी लागली.
सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आणि दिवाळीचा सण असताना गोरगरिबांचे अन्नसुरक्षे अंतर्गत येणारे रेशन बंद करणे अन्यायकारक आहे. शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास यापुढील आंदोलन पुणे-बंगळूर हायवे रस्ता रोको असेल आणि या सर्व परिणामांची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
आंदोलनात उपस्थित असलेले मान्यवर व पदाधिकारी:
मा. राजू यादव (करवीर तालुका प्रमुख, उबाठा पक्ष)
मा. विजय देवणे (शहर संपर्क प्रमुख)
मा. विशाल देवकुळे (उपजिल्हाप्रमुख)
तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते.
आंदोलनात उपस्थित असलेले इतर कार्यकर्ते
वीरेन्द्र भोसले, बाळासाहेब नजकडे, रामराव पाटील, योगेश कोळार, कैलास जाधव (अन्ना), महादेव खोरगडे, सचिन नगरेकुक, बाबुराव पाटील, सुभान फुलवाले, अनिक जाधव, दिक्कू चोपराणी, अनित ताकी, राहुल गिरोले, संदीप दलवी, गणेश चदरे, पृथ्वीराज माने, अजित चव्हाण, आनंदा भंगाने, कृष्णान एक्के, रफू बेपारी, मोहन राजपूत, उत्तम आडसूळ, सचिन साळुंखे, दिपकू पोपराणी, शंकर कांबळे, सूरज इंगवले, संदीप निगोडे, शाहजाद फुलवाले, राजू सांगावकर, विवेक देसाई, रमेश चव्हाण, कडू पवार, बाळूसाहेब तामगावे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

traffic tail

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

error: Content is protected !!