Edition

इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना २० टक्के दिवाळी बोनससह विविध मागण्यांचे निवेदन; सहाय्यक कामगार आयुक्तांना साकडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी प्रतिनिधी : प्रविण केर्ले
इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमाग आणि संलग्न उद्योगांमधील लाखावर कामगारांच्या दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी ‘कामगार संघटना संयुक्त कृती समिती’ने आज सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस, २१ दिवसांची पगारी रजा आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचा पगार देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

इचलकरंजी परिसरात जॉबर, कांडीवाले, सायझर, वार्पर, प्रोसेसिंग, दिवानजी, मेंडिंग, घडीवाले, स्पिनिंग आणि सायझिंग अशा विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत आहेत. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या कामगारांना किमान वेतनाप्रमाणे ८ तास काम मिळावे यासाठी अनेक आंदोलने झाली, मात्र त्याचा मोठा फायदा होऊ शकलेला नाही. अजूनही या कामगारांना किमान वेतन तर मिळत नाहीच, शिवाय जाहीर केलेली मजुरीवाढही दिली जात नसल्याची खंत कृती समितीने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर, यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना दिवाळीनिमित्त २० टक्के बोनस, २१ दिवसांची पगारी रजा, राष्ट्रीय सुट्ट्यांचा पगार तसेच जाहीर केलेल्या मजुरीतील फरकाची रक्कम देण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या कार्यालयात दिवाळी हिशोबासंदर्भात येणाऱ्या तक्रारींचे ताबडतोब निवारण करण्याचेही निर्देश देण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन देताना लाल बावटा जनरल कामगार युनियनचे कॉ. दत्ता माने, कॉ. भरमा कांबळे, जनरल लेबर युनियनचे कॉ. आनंदा गुरव, राष्ट्रीय कापड कामगार संघटना (इंटक) चे प्रदीप शाहू व शिवाजी भोसले, महाराष्ट्र कामगार सेनेचे श्री. राजेंद्र निकम, राष्ट्रवादी कामगार संघटनेचे मदन मुरुडे, सर्व श्रमिक संघाचे कॉ. सुनील बारवाडे, करवीर कामगार संघाचे कॉ. हनमंत लोहार तसेच कोल्हापूर जिल्हा जॉबर संघटनेचे श्री. राजकुमार पोवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

traffic tail

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

error: Content is protected !!