Edition

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

नवे येडूर,(ता.चिकोडी )येथील ज्येष्ठ पत्रकार तथा तरुण भारत वृत्तपत्राचे वार्ताहर आणि सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष कै. अजित लक्ष्मण शिंदे (वय ६०) यांचे सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नवे येडूरसह चिकोडी व सदलगा परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कै. अजित लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. पत्रकारिता क्षेत्रात काम करताना त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या कार्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

कै. शिंदे हे अत्यंत मनमिळाऊ, शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते. साधी राहणी, सर्वांशी आपुलकीने वागण्याची वृत्ती, कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा आणि मित्रपरिवाराशी जपलेले आत्मीय संबंध ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. गावातील सामाजिक व सार्वजनिक जीवनातही त्यांना विशेष मानाचे स्थान होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नवे येडूरसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एका अनुभवी ज्येष्ठ पत्रकाराच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून कै.अजित लक्ष्मण शिंदे यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

traffic tail

नवे येडूर येथील ज्येष्ठ पत्रकार कै.अजित लक्ष्मण शिंदे यांचे दुःखद निधन.तरुण भारतचे वार्ताहर व सदलगा विभाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड; पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ.

error: Content is protected !!