
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर सोमवार पेठ येथील देशभूषण हायस्कूल च्या भिंती लगत घाण कचरा आणि झाडी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी ह्या भागातील मुकादम तसेच मुक्कामाच्या वरिष्ठाना राजे फाऊंडेशन चे संस्थापक रियाज जैनापुरे यांनी अनेक वेळा ह्या विषयी कळवून देखील ह्या कडे त्यांनी लक्ष दिले नाही आता आयुक्तांनी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण ह्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांना रोगराई होऊ शकते याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी या प्रकरणाकडे आयुक्तांनी लक्ष घालून हा परिसर स्वच्छ करावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकांना आहे.









