इचलकरंजी : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत इचलकरंजी येथील भाजीपाला व्यापारी सचिन दत्तात्रय देसाई यांना प्रतिष्ठेचा ‘न्याय निवाडा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या सचिन देसाई यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. पुरस्काराबाबतची अधिकृत घोषणा निमंत्रणपत्राद्वारे करण्यात आली होती.
या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, इचलकरंजी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचा गौरव झाल्याने देसाई यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.








