
बेडकिहाळ प्रतिनिधी — सध्याच्या या गतिमान बदलत्या काळात सहकारी संस्थेचे जाळे गतीने व्यापत असून, या द्वारे सर्वसामान्य गरजू लोकांच्या आर्थिक अडचणी त्वरीत पणे दूर होत आहेत. पण सर्व सामान्य सभासदांचे हित रक्षण करत, त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत असलेल्या संस्थाच प्रगती साध्य करू शकतात. त्या दृष्टीने ग्रामीण भागात अल्फा वधीतच सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत असलेल्या कोगनोळीच्या “स्वाभिमानी रयत को ऑपरेटिव्ह, सोसायटीचे कार्य महत्वाचे ठरत आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शट्टी यांनी व्यक्त केले.
शुक्रवार तारीख 30 रोजी बेडकिहाळ येथील स्वाभिमानी रयत को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या, कोगनोळी ,येथील चौथ्या शाखेच्या उद्घाटना प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. पि के पी एस चे अध्यक्ष पासगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी
माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, संदीप पाटील,युवा नेते दत्तकुमार पाटील, शिवनेरी सौहार्द संस्थेचे संस्थापक आर जी डोमणे, यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी राजू शट्टी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तर फीत सोडून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर संगणकाचे पूजन पासगौडा पाटील, आर जी डोमणे,व संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटक ,अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत राजगौडा बा पाटील यांनी केले. तर बाहुबली राजगौडा पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
या वेळी खासदार राजू शट्टी, व उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पहिल्याच दिवशी एक कोटीच्या वर ठेवी संग्रहित झाली, मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतींचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी शेतकरी संघटनचे कार्यकर्ते रमेश पाटील, बाबासाहेब सोमण खोत, तात्यासाहेब केस्ते, आर जी डोमणे व पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी बेडकिहाळ शाखेचे अध्यक्ष आनगौडा पाटील, उपाध्यक्ष सिदगौडा पाटील,संचालक अभिषेक पाटील ,अमोल पाटील, डॉ निलेश चौगले,अमोल जाधव, महांतेश गोणे, बाहुबली नारे, डॉ अभिनंदन सोमण खोत,संतोष पाटील, धनाजी चव्हाण, यांच्या सह अशोक आरगे, बाळासाहेब कागले, यांच्या सह मुख्य व्यवस्थापक राजकुमार पाटील, शाखा व्यवस्थापक युवराज खोत, यांच्या सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कोगनोळी, बेडकिहाळ व शमनेवाडी परिसरातील युवा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रवीणकुमार शट्टी यांनी केले तर आणगौडा पाटील यांनी आभार मानले.










