Edition

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रविण केर्ले

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांची ऊसदराची मागणी आणि केंद्र सरकारने निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) यामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रति टन ऊसदरावर चर्चा करून लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.

गाळप हंगाम २०२६-२७ मधील अडचणी आणि उपाययोजनांबाबत पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात बैठक झाली. यावेळी गळीत हंगाम सुरू करणे, ऊसदर निश्चिती, ऊस वजनकाट्यांची भरारी पथकांमार्फत तपासणी, ऊस वाहतूक संघटनांची निवेदने तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप हंगामात भेडसावणाऱ्या समस्या, ऊस वाहतुकीतील अडचणी आणि दरातील तफावत यावर उपस्थितांनी आपली मते मांडली. ऊस उत्पादकांना अपेक्षित असलेला दर आणि साखर कारखानदारांकडून दिला जाणारा दर यामध्ये अंतर असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. ऊसदराच्या प्रश्नावर प्रत्यक्ष निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल. दोन्ही बाजूंच्या भूमिका समजून घेऊन ऊसदराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनीही ऊसदरातील तफावतीचा मुद्दा उपस्थित केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर आणि साखर कारखानदारांकडून दिल्या जाणाऱ्या दरामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कारखानदार, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून योग्य तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रादेशिक सहसंचालक (साखर) उज्ज्वला पळसकर यांच्यासह साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ऊसदराचा प्रश्न अद्याप चर्चेच्या टप्प्यावर

गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांनी संयुक्त बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर आणि कारखानदारांची भूमिका यामध्ये नेमका समन्वय कसा साधला जाणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. आगामी बैठकीत होणाऱ्या चर्चेतून ऊसदराचा तिढा सुटणार का, हे स्पष्ट होणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

error: Content is protected !!