Edition

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर (प्रतिनिधी)प्रविण केर्ले : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपद निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला महायुतीच्या १२ संचालकांनी अनुपस्थिती दर्शविल्याने निवड प्रक्रिया कोरमअभावी रखडली. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारत थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे.

गोकुळच्या पोटनियमांनुसार अध्यक्ष निवडीसाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. आवश्यक कोरम पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पडू शकत नाही. विरोधकांकडेही आवश्यक बहुमताचा आकडा नसल्याचा दावा त्यांनी केला. आमचे संचालक सध्या अनुपस्थित असले तरी आगामी बैठकीला ते उपस्थित राहतील आणि कायदेशीर प्रक्रियेनुसारच अध्यक्ष निवडला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या प्रकरणावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. सतेज पाटील यांनी केलेल्या जातीयवादाच्या आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ यांनी त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली. ‘मी जातीयवादी होतो, तर तुमच्या मुलाच्या नावे पाकीट देताना हा प्रश्न का उपस्थित झाला नाही?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच डोंगळे यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केल्यानंतर तोडगा म्हणून मुंबईत आपल्या मुलाचे नाव निश्चित झाले होते. त्यामुळे या प्रक्रियेत सतेज पाटील यांचे कोणतेही उपकार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ यांनी पुढे बोलताना, सतेज पाटील यांच्याकडे स्पष्ट बहुमत असेल तर त्यांना आमच्या संचालकांची गरज का भासते, असा सवाल उपस्थित केला. सभेला उपस्थित राहणे हा प्रत्येक संचालकाचा अधिकार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केल्यानंतर बेकायदेशीरपणे अध्यक्ष निवड कशी होऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शशिकांत पाटील यांना अध्यक्ष करण्याचा शब्द आपण पाळणार असल्याचे सांगत, सध्याचा प्रश्न संचालकांची फोडाफोड करण्याचा नसून १४ संचालकांचा आवश्यक कोरम पूर्ण करण्याचा आहे, असे मुश्रीफ यांनी ठामपणे सांगितले. तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार सोबत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर राजकीय टोलाही लगावला.

न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष

गोकुळमधील अध्यक्षपदाची निवड आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नसून कोल्हापूरच्या राजकारणातील प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. एका बाजूला १४ संचालकांच्या कोरमचा कायदेशीर मुद्दा, तर दुसऱ्या बाजूला बहुमत आणि राजकीय समीकरणांचा संघर्ष सुरू आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने घेतलेल्या न्यायालयीन भूमिकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता उच्च न्यायालयात कोणती भूमिका मांडली जाते आणि त्यावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

error: Content is protected !!