Edition

पारंपरिक वनौषधी चिकित्सेच्या परंपरेला गुणवत्तेची साथ! कनेरी मठात पारंपरिक वैद्य प्रमाणीकरण परीक्षा; महाराष्ट्रातील ५५ पारंपरिक वैद्यांचा सहभाग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर:प्रतिनिधी-उदय साळुंखे

कनेरी मठ, कोल्हापूर : पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचा सन्मान आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कनेरी मठ येथे भारत सरकारची गुणवत्ता संस्था असलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या स्वैच्छिक प्रमाणन योजनेअंतर्गत दि. २८ व २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पारंपरिक वैद्य प्रमाणीकरण परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ५५ पारंपरिक वैद्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या PrCB चे राष्ट्रीय समन्वयक श्री. अरविंद यादव यांची विशेष उपस्थिती लाभली. परीक्षक म्हणून डॉ. भीमाशंकर पाटील, श्री. नानासाहेब तळेकर, वैद्य श्री. जयप्रकाश दायमाजी, श्री. अनंत झांबरे, श्री. रामेश्वर माने आणि श्री. धनंजय वासकर यांनी जबाबदारी पार पाडली.

श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यशोवर्धन बारामतीकर सर यांनी उपस्थित वैद्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व सहभागी वैद्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन गोग्राम स्वराज्य हेल्थकेअर कौन्सिल, हसूर खुर्द, ता. कागल यांचे संस्थापक अध्यक्ष वैद्य प्रविण पाटील 8390139575 यांनी केले.

पिढ्यान्‌पिढ्या जपलेला पारंपरिक वनौषधी चिकित्सेचा ज्ञानवारसा आणि गुणवत्तेवर आधारित प्रमाणन प्रक्रिया यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

error: Content is protected !!