बेडकिहाळ प्रतिनिधी — येथिल ऐतिहासिक दसरा महोत्सवा निमित्य दसरा उत्सव कमिटी शांतीनगर सर्कल, यांच्या सहकार्याने, व आमदार शशिकला जोल्ले तसेच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, व जोल्ले उद्योग समूहाच्या वतीने स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित “स्वामीराया ” नाटकाचा प्रयोग बुधवार तारीख 21 ऑक्टोबर रोजी बी एस हायस्कूलच्या आवारात रात्री 8 वाजता आयोजित, करण्यात आला असून, सुमारे 30 कलाकात्यांच्या अभिनयाने सहकार्यलेल्या असा हा महा नाटक आपल्या परिसरात प्रथमच होत असून परिसरातील स्वामी भक्तांनी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमित खोत यांनी केले
या वेळी सुहास डोमणे म्हणाले, या नाटकाचे उद्घाटन माजी खासदार,जिल्हा बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले,व आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या धार्मिक नाटकास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
या प्रसंगी शांतीनगर दसरा कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण,सुरेश पाटील, शरद धनाप्पगोळ, भारत बोरगावे,पवन पाटील,गुरशांत मुरगोडे, विनायक मोरे आदी उपस्थित होते. राजू संकपाळ यांनी आभार मानले.











