Edition

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूक; मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर! शिक्षक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पदवीधरांत सोलापूर अव्वल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर | प्रतिनिधी – प्रविण केर्ले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपलब्ध आकडेवारीनुसार, शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के मतदान झाले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया पार पडली.

पदवीधरांत सोलापूर, शिक्षकांत सातारा अव्वल

पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४२ टक्के मतदान झाले. सातारा ६६.९२%, कोल्हापूर ६३.८३%, पुणे ६१.४७%, तर सांगलीत ५५.६२% मतदान नोंदवले गेले.

शिक्षक मतदारसंघात सातारा जिल्हा ८९.३९ टक्के मतदानासह आघाडीवर राहिला. सोलापूरमध्ये ८९%, कोल्हापूरमध्ये ८८.६२%, सांगलीमध्ये ८७.८३%, तर पुण्यात ७८.०८% मतदान झाले.

२७ ऑक्टोबरला मतमोजणी

दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे वृत्त आहे. आता निकालाकडे उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

— प्रतिनिधी : प्रविण केर्ले

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail
error: Content is protected !!