Edition

पोलीस अधीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतर कोल्हापूर खंडपीठावरील लाँगमार्च तात्पुरता स्थगित! सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीची स्वतंत्र चौकशी; आठ ते दहा दिवसांत कारवाईचे आश्वासन – सचिन जाधव.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली, दि. १४ : डोंगरवाडी, ता. वाळवा येथील दलित समाजातील रविंद्र सकटे व महादेव सकटे यांच्यावरील कथित अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने उद्या, दि. १५ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे काढण्यात येणारा लाँगमार्च सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तसेच, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनाबाबतही पुढील निर्णय चौकशीच्या निष्कर्षांनंतर घेण्यात येणार आहे.

सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी *आज दुपारी २ वाजता सांगली पोलीस मुख्यालयात संबंधित पदाधिकारी व तक्रारदारांची बैठक बोलावली होती.

या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बावसकर, ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील, रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, बापूसाहेब बढेकर, दादा साठे, सुशील सावंत, पिराजी थोरवडे तसेच तक्रारदार रविंद्र सकटे, महादेव सकटे, रोहित सकटे हे उपस्थित होते.

सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीची स्वतंत्र चौकशी.

बैठकीत सकटे कुटुंबीयांच्या तक्रार अर्जावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, न्यायप्रविष्ट बाब असतानाही कुरळप पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. *या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी अधिकारी म्हणून सांगलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बावसकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बैठकीत सांगितले.

सदर चौकशी आठ ते दहा दिवसांत पूर्ण करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले. तसेच, सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीतील तथ्यांची निष्पक्ष व पारदर्शकपणे तपासणी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी प्रस्तावित लाँगमार्च स्थगित करण्याची विनंती केली.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या निर्देशानुसार तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दाखविलेल्या तत्परतेच्या पार्श्वभूमीवर आणि स्वतंत्र चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्यामुळे उद्या, दि. १५ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे काढण्यात येणारा लाँगमार्च तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी दिली.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार!

सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीची स्वतंत्र चौकशी निष्पक्षपणे होऊन तक्रारीतील तथ्यांच्या आधारे योग्य ती कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. चौकशीत तथ्ये समोर आल्यानंतरही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्यास रिपब्लिकन पक्ष व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. सकटे कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम इशारा रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!