Edition

सेलू येथील गेल्या४३ वर्षाची अखंड परंपरा असलेल्या जय भवानी नवरात्र महोत्सवास सुरुवात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील श्री संत गोविंद बाबा चौक मठ गल्ली मधील जय भवानी नवरात्र महोत्सवास सुरुवात मा.नगरसेवक कै प्रकाशसिंह ठाकूर यांनी ४३ वर्षांपूर्वी १९८४ ला या नवरात्र महोत्सवास सुरुवात केली होती, तेव्हापासून आजपर्यंत अखंडित नवरात्र महोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. शहरात मध्यभागी असलेल्या या मंदिरास शहरातील सर्व भाविक भक्त व महिला नवरात्रात येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. नवरात्रीचे नऊ दिवस भावीक भक्तांची गर्दी पाहता जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
कोजागिरी पौर्णिमेस शहरातून भव्य देवीचा छबिना काढून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यंदा दुष्काळाचे सावट पाहता बाकीचे कार्यक्रम रद्द करून मंडळातर्फे शहरात पाणी बचाव मोहीम राबवण्यात येणार आहे असे मंडळाच्या वतीने नागेश गणेशसिंह ठाकूर यांनी सांगितले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

traffic tail

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

error: Content is protected !!