Edition

कामेरीत एकाच रात्री पाच घरफोड्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली : प्रतिनिधी ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामेरी येथे एकाच रात्री पाच बंद घरांचे कुलूप व कडी-कोयंडे उचकटून चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या कारवाईत टोळीचा म्होरक्या असल्याचा संशय असलेल्या प्रविण राजा शिंदे (वय ३५, रा. गणेशवाडी रोड, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दोन लोखंडी कटावण्या असा एकूण १० लाख ६७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन संशयित आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मध्यरात्री ते पहाटे पाच घरांना लक्ष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामेरी येथे ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरांना लक्ष्य केले. संतोष खाशेराव परीट, बाबू नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्वला गजानन जाधव आणि सारिका राजेंद्र सोनावले या नागरिकांच्या घरांच्या दरवाजांचे कडी-कोयंडे उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटांतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला अटक

 

एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याने या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी दिले

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

 

१२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील पथक ईश्वरपूर व तासगाव विभागात गोपनीय माहिती घेत असताना पाचवा मैल चौक येथे एका संशयिताची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने संशयित प्रविण राजा शिंदे याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीदरम्यान पाठीवरील सॅकमध्ये दोन लोखंडी कटावण्या, २०० रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ६७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

चौकशीत पाच घरफोड्यांची कबुली

पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत प्रविण शिंदे याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह कामेरी येथे पाच बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आर्यन कान्हा काळे आणि अजय लायन्या शिंदे, दोघेही रा. फडतरवाडी, ता. खटाव, जि. सातारा, अशी अन्य दोन संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. हे दोघेही सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेला प्रविण शिंदे आणि त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याविरुद्ध सातारा आणि सांगली जिल्ह्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी यांसारखे १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

 

आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे करीत आहेत.

या संयुक्त कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ईश्वरपूर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे, सांगली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!