Edition

संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ ९२९ विद्यार्थ्यांना पदवी-पदव्युत्तर पदव्या; १४ जणांना पीएच.डी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नागपूरचे संचालक प्रा. डॉ. भीमराया मेत्री प्रमुख पाहुणे, तर गोवा सरकारच्या उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ मुगेराया सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.

या समारंभात इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांतील एकूण ९२९ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदव्या, तर १४ जणांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. एस. एम. इंगळे यांनी दिली. विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!