Edition

पुणे महानगरपालिकेचा भोंगळा कारभार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी –
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पुणे म न पा युनियन रजि न पी एन 4761 च्या वतीने मनपातील रोजंदारातील व ठेकेदारीत काम करीत असलेल्या लोकांना उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल केली होती. त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला त्यामध्ये असा उल्लेख केला आहे की आठ आठवड्यामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पुणे म न पा युनियन पी एन 4761या संघटनेचे पदाधिकारी सोबत चर्चा करून योग्य व नियमानुसार 442 लोकांना कामावर घेण्यात यावे. परंतु पुणे महानगर पालिका प्रशासनाकडून या निकालाचा केराची टोपली दाखवली आहे.
तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वयंघोषित अध्यक्ष गोविंद परमार यांनी आमच्या संघटनेच्या विरोधात पुणे मनपा मध्ये अ भा स म काँग्रेस 7262 ही युनियन गठीत केली आहे. मा.उच्च न्यायालयाचे निकालाची प्रत ही युनियन चे पदाधिकारी सजीव आगरकर,नंदकुमार रणधीर,प्रताप सोलंकी प्रेमाजीभाई पटेल कैलास चौधरी हे सर्व लोकांना दाखवून त्याची दिशाभूल करून कामाला लावतो म्हणून आर्थिक फसवणूक करीत आहे. त्याचे पुरावा आमच्या हाती लागले आहेत. वरील सर्व प्रकार पुणे मनपातील अधिकारी नितीन केंजळे, संतोष वारुळे, संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनात आणून देखील योग्य ते ठोस पाऊल न उचलता त्यांना आतून मदत करीत आहे अशी संघटनेच्या वतीने दाट शक्यता आहे. या सर्व बाबींचा तक्रारी व निवेदन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, विभागीय आयुक्त माननीय पोलीस आयुक्त यांना संघटनेच्या वतीने दिलेले आहे. संघटनेच्या वतीने विनंती आहे की समन्वय समिती पुणे मनपा स्तरावरील गठीत केली त्यातील आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस रजिस्टर नंबर 72 62 पुणे प्रशासनाला 386 लोकांची जी बोगस यादी दिली आहे. त्याच्यावर सीबीआय चौकशी बसवण्यात यावी. अन्यथा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या रजिस्टर नंबर 47 61 वतीने पुणे महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, सचिन लांडगे, राष्ट्रीय अध्यक्षा परविनताई लालबिगे, उपाध्यक्ष तेजस्विनीताई सडेकर, ज्ञानेश्वर माने, सूर्यकांत यादव, रवी बेंगळे आनंद भिंगारदिवे, बाबा गोणेवार, अजित मापारे यांनी दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!