Edition

मांगले गावचा अनोखा उपक्रम; पावसासाठी मंगलनाथ चरणी साकडे..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वारणा नदीत स्नान करून कळशीतून आणलेले पाणी मंगलनाथाच्या गाभाऱ्यात भरले; दुष्काळ हटवून पाऊस पडण्याची ग्रामस्थांची प्रार्थना..
मांगले, दि. ६ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत असताना, मांगले ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धेतून पावसासाठी अनोखा धार्मिक उपक्रम राबविला. गावचे ग्रामदैवत श्री. मंगलनाथ यांच्या चरणी साकडे घालत वरुणराजाने कृपादृष्टी करावी, अशी सामूहिक प्रार्थना ग्रामस्थांनी केली.
मंगळवारी सकाळी आठ वाजता ग्रामदैवत श्री. मंगलनाथ यांच्या उत्सवमूर्तीसह गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वारणा नदीकडे प्रस्थान केले. नदीपात्रात स्नान केल्यानंतर उत्सवमूर्तीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
आरतीनंतर ग्रामस्थांनी आपापल्या कळशीत वारणा नदीचे पाणी भरून ते मंदिरात आणले. हे पाणी ग्रामदैवत श्री. मंगलनाथ यांच्या गाभाऱ्यात भरण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मनोभावे प्रार्थना करत, दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि लवकरच समाधानकारक पाऊस पडावा, अशी मंगलनाथाच्या चरणी विनवणी केली.
या धार्मिक उपक्रमातून मांगले ग्रामस्थांची श्रद्धा, एकजूट आणि शेतकऱ्यांविषयीची आस्था अधोरेखित झाली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा हिरवाई नांदावी, पिकांना जीवदान मिळावे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, अशी सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“मंगलनाथाच्या चरणी केलेली सामूहिक प्रार्थना स्वीकारली जाऊन वरुणराजाचे आगमन व्हावे आणि शेतकऱ्यांच्या संकटाचे निवारण व्हावे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!