वाई : प्रतिनिधी — किसन वीर महाविद्यालय, वाई येथील प्राध्यापक डॉ. संदीप वाटेगावकर यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने ‘राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच विद्यार्थी-केंद्रित कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य तथा यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती वृषाली चव्हाण यांच्या हस्ते डॉ. वाटेगावकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संदीप वाटेगावकर यांनी हा पुरस्कार आपल्या पत्नी व मुलीसह स्वीकारला. शिक्षण क्षेत्रात अध्यापनासोबतच संशोधन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम यामुळे त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. वाटेगावकर यांचे शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.











