ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथे १ नोव्हेंबर रोजी सोहळ्याचे आयोजन
विशेष प्रतिनिधी ..
शिक्षण क्षेत्रात अत्यंत तडफेने, अविरत काम करणारे ,शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांचा आवाज बनलेल्या आ.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना ईगल फौंडेशनचा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील *शिक्षकहदय सम्राट* पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.आ.म्हात्रे सरांचे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय काम व त्या कामाप्रति असलेली निती आणि त्यांची अखंडित गती गौरवास्पद आहे. ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल घेवून त्यांना शिक्षक हद्यसम्राट पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.त्यांना विशेष मानपत्र व सन्मानचिन्ह बहाल करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करणारे , शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचा ते बुलंद आवाज बनले आहेत.
या पुरस्कार सोहळ्याला शिक्षण, सामाजिक व राजकीय ,पत्रकारिता, क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते सरांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कारामुळे शिक्षक व शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून आ. म्हात्रे सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रविवार दि.१ नोव्हेंबर २६ रोजी ,सिंहगड कॉलेज,कोर्टी- पंढरपूर येथे सकाळी १०.३० वाजता सदर सोहळा पार पडणार आहे.ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर व सर्व पदाधिकारी यांनी एका निवड पत्राद्वारे कळविले आहे.











