Edition

वाळवा-शिराळा दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने सरकार विरोधात शेतकऱ्यांत नाराजी सरकारविरोधात जनआंदोलन उभारणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले कि सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला वाळवा आणि शिराळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, सरकारने तातडीने दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केली.

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच जमीन महसुलात सवलत अशा उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, वाळवा व शिराळा यांसारख्या तालुक्यांना या सवलतींपासून वंचित ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यात शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, चालू हंगामातील पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन तसेच जमीन महसुलात शंभर टक्के सूट अशा उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही सवलत किंवा माफीची तरतूद करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तासगाव आणि मिरजसह दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, वाळवा, शिराळा, तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून या तालुक्यांनाही दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

वाळवा तालुक्यात पावसातील खंडामुळे ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन,हळद,केळी, यांसह विविध पिकांवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी भात पिकावर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागला आहे. कोयना आणि वारणा धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही नदीपात्रातून उपसा बंदी लागू केल्यामुळे नदीकाठच्या ऊस, केळी, सोयाबीन, भात व भुईमूग पिकांवर परिणाम झाल्याचा आरोप जाधव यांनी केला.

सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर शेतकरी आंदोलन करणार असून, पावसाअभावी वाया गेलेल्या पिकांचे पुरावे आणि पिकांसह निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली.

ज्या गावांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झाल्याचे आढळेल, त्या गावांना दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे करून वाळवा व शिराळा तालुक्यांतील प्रत्येक गावांत जावून अधिकाऱ्याने पाहाणी करावी.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाळवा व शिराळा तालुक्यातील प्रत्यक्ष पाहणी करावी व शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन तातडीने दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा. अन्यथा सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल,तसेच आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी संबंधितांना तालुक्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!