Edition

कानूर बुद्रुक येथे डॉल्बी-ताशांच्या गजरात गणरायाला उत्साहात निरोप; घटप्रभा नदीवर भक्तीभावात विसर्जन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड प्रतिनिधी – कानूर बुद्रुक : येथील श्री भावेश्वरी चव्हाटा कला, क्रीडा व सांस्कृतिक सार्वजनिक गणेश मंडळ, कानूर बुद्रुक (छत्रपती संभाजी महाराज चौक) यांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणरायाला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते व युवा वर्ग डॉल्बी आणि ताशांच्या गजरात नाचत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत कानूर बुद्रुक येथील ग्रामस्थ, युवा पिढी तसेच पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उत्साहाच्या वातावरणातही सर्वांनी एकमेकांची काळजी घेत, शिस्त व सुरक्षितता राखत मिरवणूक पार पाडली.

मिरवणुकीदरम्यान मंडळाचे कार्यकर्ते आणि युवा वर्गाने डॉल्बी-ताशांच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य करत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गणरायाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. भक्ती, उत्साह आणि भावनिक वातावरणात मिरवणूक बिजूर येथील घटप्रभा नदीच्या विसर्जनस्थळी पोहोचली. तेथे विधिवत पूजा करून श्री गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवात कानूर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी आणि युवा पिढीने उभारलेल्या आकर्षक मंडप व केलेल्या सुंदर सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच विविध भजनी मंडळांनी दिलेले सहकार्य आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे गणेशोत्सवाला विशेष भक्तिमय वातावरण लाभले.

गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कानूर बुद्रुक व परिसरातील ग्रामस्थ, युवा वर्ग तसेच सर्व भजनी मंडळांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव आनंदी, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!