चंदगड प्रतिनिधी –
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून आणि अमित तरवाळ (चंदगड) यांच्या विशेष प्रयत्नातून चंदगड तालुक्यात ओबीसी जनगणनेच्या संदर्भात एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शरद कुंभार सर हे होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मा. राहुल मोरे सर, मा. अमित सुळेकर आणि शरद पाटील सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा चंदगड युनिटच्या वतीने आयोजित केलेल्या या रॅलीस नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.











