Edition

सेलू-पाथरी रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजवरून पाथरी व रवळगाव कडे वळण रस्ता द्या; डॉ. संजय रोडगे यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांना निवेदन!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी – सेलू-आष्टी रस्ता रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण कामाच्या पार्श्वभूमीवर, सेलू-पाथरी रोडवरील रेल्वे गेटवर प्रस्तावित ओव्हरब्रिजवरून पाथरी व रवळगावच्या दिशेने वळण रस्ता (सर्व्हिस रोड/टर) उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या व लोकहिताच्या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेकडो नागरिकांनी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदन देण्यापूर्वी या भागातील संबंधित सर्व ग्रामपंचायतींचे ठराव यापूर्वीच प्रशासनाला व कार्यालयाला सादर करण्यात आले होते. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था, खाजगी उद्योग, कारखाने आणि कॉटन जिनिंग आहेत. त्याच बरोबर मालवाहू कंटेनर व अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. वळण रस्ता न मिळाल्यास भविष्यात वाहतुकीची मोठी कोंडी व दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व तातडीने वळण रस्ता मंजुरीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.नागरिकांच्या या रास्त व अत्यंत महत्त्वाच्या मागणीबाबत लवकरात लवकर सकारात्मक व ठोस निर्णय न घेतल्यास, भविष्यात या भागातील ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.निवेदनावर डॉ. संजय रोडगे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू) यांच्यासह माऊली ताठे, श्री रामेश्वर रोडगे, रामेश्वर राठी, निर्मलाताई लिपणे, अश्विनी पवार, प्रभाकर गजमल, रामेश्वर गटकळ, दीपक रोडगे, विलास रोडगे, संतोष रोडगे, प्रकाश गजमल, राजेभाऊ गाडेकर, मोतीराम गायकवाड, मंगेश पवार, भाऊराव लहाने, संजय गटकळ, महादेव नजान, विठ्ठलराव ताठे, गजानन ताठे, विकास ताठे, कैलास ताठे, रोहिदास भदरगे, गोविंद भदर्गे, भागवत लिखने, कैलास पवार, सूर्यभान भोसले, अशोक लिपणे, दीपक गटकळ, आसाराम रोडगे, कैलास मोगरे, संतोष सरोदे, श्रीराम पितळे, कल्याण मोगरे, दत्ता पवार, योगेश खरवडे, सुरेश लिपणे यांसह शेकडो ग्रामस्थ व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!