Edition

दिव्यांग लक्ष्मी कोळीला शिलाई मशीन व साहित्य देत स्वावलंबनाची नवी दिशा! धाराशिवचे रोहित जाधवर यांचे दातृत्व; पंचायत समिती सदस्य व शिरोळचे गटनेते प्रतीक उर्फ बंटी पाटील यांचा मदतीचा हात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राजापूर : श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था, टाकवडे यांच्या वतीने राजापूर वाडी येथील दिव्यांग कुमारी लक्ष्मी कोळी हिला स्वयंपरोजगारासाठी शिलाई मशीन व शिलाई साहित्य देऊन स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देण्यात आली.
धाराशिव येथील दानशूर रोहित जाधव यांनी लक्ष्मी कोळी हिच्यासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून दिली. दिव्यांग व्यक्तीला केवळ आर्थिक मदत न करता तिच्या हाताला कायमस्वरूपी रोजगाराचे साधन मिळावे, या भावनेतून त्यांनी केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. दूरच्या धाराशिव येथूनही दिव्यांग व्यक्तीच्या स्वावलंबनासाठी मदतीचा हात पुढे करून जाधव यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्य व शिरोळचे गटनेते प्रतीक उर्फ बंटी पाटील यांनी लक्ष्मी कोळी हिला व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे ₹५ हजार किमतीचे शिलाई साहित्य उपलब्ध करून दिले. दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी समजून घेऊन प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणारे बंटी पाटील यांचे कार्य यावेळी विशेष कौतुकास्पद ठरले.
लोकप्रतिनिधी म्हणून पदाची जबाबदारी केवळ कार्यालयीन कामकाजापुरती मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, वंचित आणि दिव्यांग घटकांच्या प्रश्नांकडे प्रत्यक्ष लक्ष देण्याची भूमिका प्रतीक उर्फ बंटी पाटील यांनी घेतली आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची गरज ओळखून त्यांनी तत्काळ मदतीचा हात दिला. त्यांच्या या पुढाकारामुळे एका दिव्यांग मुलीला रोजगाराचे साधन मिळाले असून तिच्या आत्मविश्वासाला नवी उभारी मिळाली आहे.
यावेळी बोलताना प्रतीक उर्फ बंटी पाटील म्हणाले, “दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही करता येईल, ते करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. दिव्यांगांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी जातीने लक्ष घालू.”
दिव्यांगांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणारे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून बंटी पाटील यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे, असे मत श्री दत्त दिगं संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, “समाजातील दानशूर व्यक्तींनी दिव्यांगांना केवळ दान देण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम आणि स्वावलंबनाची संधी द्यावी. दान काही काळाची मदत करते; मात्र संधी दिल्यास दिव्यांग व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहू शकतात. रोहित जाधव यांनी शिलाई मशीन देऊन आणि प्रतीक उर्फ बंटी पाटील यांनी शिलाई साहित्य देऊन लक्ष्मी कोळीच्या स्वावलंबनाचा पाया मजबूत केला आहे.”
या कार्यक्रमास राजापूरच्या सरपंच गीता धुळाप्पा दिवटे, उपसरपंच जावेद खानसो जमादार, राजापूरचे तंटामुक्तीचे अध्यक्ष दानू उर्फ शंकर पाटील,राजापूर वाडीचे सरपंच रावसाहेब कोळी, पंचायत समिती सदस्य टाकवडे व शिरोळचे पंचायत समितीचे गटनेते प्रतीक उर्फ बंटी पाटील, राजापूर सोसायटीचे संचालक मोहन ढवळे, संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, सुनीता पाटील, राहुल पाटील, खजिनदार राजू पाटील यांच्यासह ग्रामस्थ, दिव्यांग बंधू भगिनी, व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमातून “दिव्यांगांना दान नव्हे, तर स्वावलंबनाची संधी” हा संदेश समाजापुढे ठेवण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!