Edition

चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याला ‘ऊस विकासासाठी प्रथम क्रमांक’चा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज चिकोडी प्रतिनिधी –
चिकोडी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याला उसाच्या अधिक उताऱ्याच्या (रिकव्हरी) क्षेत्रातील “उत्कृष्ट ऊस विकासासाठी प्रथम क्रमांकाचा” राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, नुकताच हा पुरस्कार नवी दिल्ली येथे मोठ्या थाटात प्रदान करण्यात आला.

देशातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या ‘नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली’ या संस्थेतर्फे दरवर्षी साखर कारखान्यांच्या वार्षिक कामकाजाचे मूल्यांकन केले जाते. विविध निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात येते.

चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस विकासासाठी अनेक प्रभावी योजना राबविल्या आहेत. या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादकतेत आणि साखरेच्या उताऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. कारखान्याच्या या भरीव योगदानाची दखल घेऊन एनएफसीएसएफने कारखान्याला या मानाच्या प्रथम पुरस्काराने सन्मानित केले आहे. 22 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एनएफसीएसएफच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि एनएफसीएसएफचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

कारखान्याच्या वतीने, कारखान्याचे संचालक आणि एनएफसीएसएफचे विद्यमान संचालक, तसेच केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष अमित कोरे, कारखान्याचे संचालक अण्णासाहेब जोल्ले आणि कारखान्याच्या इतर अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य: अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे
या अभिमानास्पद यशाबद्दल बोलताना कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे म्हणाले, “कारखान्याचे शिल्पकार पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचे मार्गदर्शन, तसेच केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष आणि एनएफसीएसएफचे संचालक अमित प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने घेतलेले योग्य निर्णय यामुळेच हे शक्य झाले आहे. याशिवाय, आमचे सभासद शेतकरी, कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कामगारांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे.

या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, कारखाना व्यवस्थापन, सर्व अधिकारी, कामगार आणि सभासद शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!