Edition

गणेशोत्सवानिमित्त तिडी पिंपळगावात भक्ती, प्रबोधन आणि समाजसेवेचा संगम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू :- सेलू तालुक्यातील
तिडी पिंपळगाव येथील शिवप्रतिष्ठान गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशमूर्ती स्थापना ते सांगता सोहळ्यापर्यंत विविध उपक्रमांमुळे गावात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि.१४ सप्टेंबर रोजी श्री गणेशमूर्तीचे विधिवत आगमन व स्थापना करून गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली. उत्सवाच्या कालावधीत दररोज हरिपाठ, भजन, पारायण तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि. १५ सप्टेंबर रोजी ह.भ.प. कथाकार आरतीताई कावरे बोरीकर, तर दि. १६ सप्टेंबर रोजी ह.भ.प. राम महाराज मगर हिशीकर यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ह.भ.प. श्याम महाराज गायकवाड देऊळगावकर, ह.भ.प. शिवानीताई कावरे बोरीकर, ह.भ.प. कैलास महाराज घुमारे तिडी पिंपळगावकर यांच्यासह विविध कीर्तनकारांच्या सेवेमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांसाठी दि. १७ सप्टेंबर रोजी संगीत खुर्ची स्पर्धा, तर दि. १९ सप्टेंबर रोजी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता. महिलांसाठी दि. २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. विविध खेळ, उखाणे व मनोरंजक उपक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. धार्मिक उत्सवाबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
दि. २५ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त ह.भ.प. एकनाथ महाराज आंबळे यांच्या हरिपाठ व कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रतिष्ठान गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या संपूर्ण गणेशोत्सवाचे नियोजन शिवप्रतिष्ठान गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन घुमारे, उपाध्यक्ष महेश घुमारे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले. धार्मिक परंपरे सोबतच सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांना व्यासपीठ, महिलांचा सहभाग आणि समाज प्रबोधनाला प्रोत्साहन देत यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!