शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित, खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.
यानंतर इयत्ता 9 वी तील विद्यार्थीनी कु.तृप्ती अनिल कडतारे हिने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य,सामाजिक कार्य व त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवना विषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एफ.आय.शिकलगार सर यांनी केले तर आभार सौ.राजोबा एस.एस.यांनी मानले.











