Edition

उचगावला दणाणून सोडणाऱ्या डॉल्बीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; चार मंडळांचे ट्रॅक्टर अन् साऊंड सिस्टीम जप्त!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी – उदय साळुंखे, उचगाव (ता. करवीर) येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम पायदळी तुडवत, कानठळ्या बसवणारा आवाज करणाऱ्या चार अरेरावी करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत जय शिवराय तालीम मंडळ, मंगोबा तालीम मंडळ, दोस्ती ग्रुप आणि सत्या ग्रुप या मंडळांची साऊंड सिस्टीम आणि ट्रॅक्टर जप्त करत पोलिसांनी आपला करडा दरारा दाखवून दिला आहे. शनिवारी उचगाव येथे विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहात सुरू असताना, वरील मंडळांनी शांततेच्या नियमांना बगल देत डॉल्बीचा प्रचंड दणदणाट सुरू केला होता. या ध्वनी प्रदूषणाचा सामान्य नागरिकांना आणि भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. नियमांचे हे गंभीर उल्लंघन पोलिसांना अजिबात खपवून घेण्यासारखे नव्हते. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल कदम यांच्या सतर्क आणि आक्रमक भूमिकेमुळे या मंडळांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर पोलिसांच्या रडारवर आणखी काही मंडळे असून, त्यांच्यावरही लवकरच धडक कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या कठोर कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!